Articles


We have been writing in newspapers and magazines on various subjects like native plants, restoration, water, soil, human life style etc. Main objective of all these articles is to spread awareness about ecological conservation and share our experience of working on ground for ecological restoration. Hope readers enjoy reading these articles and also apply these concepts wherever applicable. You can also download PDFs for the same.


शेतकरी आणि पर्यावरण
   |  Download PDF

गेल्या डिसेंबरमध्ये (2018) किसान या कृषी प्रदर्शनात भाग घेतला आणि पाच दिवसात आम्ही पाच जणींनी मिळून सुमारे दहा हजार शेतकऱ्यांशी संवाद साधला. संवाद साधाच होता. शेती ज्या निसर्गाच्या जोरावर चालते त्या निसर्गाची काळजी घेतली तर पुढच्या पिढ्यांना शेती करायला मिळेल याची आठवण करून देण्याचा. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. शेतकरी ही कल्पना धुडकावून लावतील की काय अशी किंचित शंका होती पण तसं अजिबातच घडलं नाही. स्टॉलवर येणाऱ्या प्रत्येकाशी बोलायला मजा आली. त्यांच्याशी बोलून समाधान वाटलं आणि आता शेतकऱ्यांबरोबर निसर्ग संवर्धनाचे काम करायचा हुरूपही वाढला. आधी शंका होती कारण अनेक जण म्हणतात की पर्यावरण संवर्धन वगैरे पोट भरलेल्यांसाठी आहे. एका बाजूने विचार केला तर हे थोडं पटण्यासारखं देखील आहे. परंतु या उपक्रमामुळे मात्र काही वेगळ्याच मतांवर शिक्कामोर्तब झालं. त्यातला एक प्रातिनिधिक संवाद...
 
लागवड (Mass Plantations): शास्त्रीय दृष्टीकोन    |  Download PDF

भारतात एकूण अठरा हजार एवढ्या फुलणाऱ्या वनस्पती आहेत आणि यातले पाचेकशे तर सहजच वृक्ष असतील. ही सगळी विविधता भारतातल्या अकरा जैवभौगोलिक प्रदेशा
नुसार बदलते. परंतु तरीही संपूर्ण भारतात आपण मोजकेच वृक्ष लागवडीसाठी वापरतो. हे सपाटीकरण शुद्ध अशास्त्रीयच वाटत. आधीच आपण शेतीतली विविधता घालवून बसलो आहे. पुरातन काळापासूनच नवनवीन खाद्य वाण आयात करत जुनी स्थानिक वाण हळूहळू नाहीशीच होत आहेत. इथे केंद्रस्थानी मानव आहे म्हणून हे सगळ गरजेच आहे असं सोयीनी म्हटलं तर जिथे केंद्रस्थानी निसर्ग आहे तिथे निसर्गकेंद्री विचार करणे गरजेचे नाही काय ? निसर्ग संवर्धनाकरता सर्वसमावेशक दृष्टीकोनातून काय उपाययोजना गरजेच्या आहेत हे बघणे महत्वाचे. आणि म्हणूनच लागवडीकरतादेखील शास्त्रशुद्ध विचार गरजेचा ठरतो.

 मियावाकी   |  Download PDF

जपानमध्ये विकसित झालेली "मियावाकी" ही वृक्षारोपणाची पद्धत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अलीकडे वापरली जाताना दिसते ; परंतु आपल्याकडची प्रदेश वैशिष्ट्य पाहता ती सर्वत्र सर्रास वापरता येणार नाही. त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन आणि नेमका उद्देश ठेवून काही थोड्या ठिकाणीच ती वापरली जायला हवी